
तीसेक पानांच्या या लेखात बाबासाहेबांनी ह्या समस्येचे फार छान विश्लेषण करून खालील मांडणी केली आहे.
शेती एक उद्योग कसा आहे,
शेतीच्या आकारमानाच प्रश्न कसा अर्थशास्त्रीय पद्धतीने बघावा लागेल,
आकारमान वाढणे का आवश्यक आहे,
त्यावरचा अतिरिक्त लोक पोसण्याचा बोजा हा कसा घातक आहे,
त्यामुळे शेती कशी तोट्यात जाते,
तोट्याची शेती कशी ग्रामीण भागाची समृद्धी खाउन टाकते.
तोट्याची ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कशी देशाची समृद्धी खाउन टाकते,
त्यानंतर त्यावरील उपाय सुचवून उपायांचे जबरदस्त समर्थनही केले आहे.
यावरचा एकमेव उपाय हा ग्रामीण समृद्धी आणणे आहे.
त्यासाठी एकमेव उपाय झपाट्याने उद्योगीकरण वाढणे आवश्यक आहे
यातून त्यांच्यामते खालील बदल आपोआपच घडून येतील.
खेड्यातील लोकसंख्येचा वाढीव बोजा शहराकडे वळेल
शेतीचे आकारमान वाढेल
शेती नफ्याची झाली की भांडवल वाढेल,
शेतीत गुंतवणूक वाढेल, ग्रामीण भागात क्रयशक्ती वाढेल. दारिद्र्य संपेल.
या लेखाचा जरूर सगळ्यांनी अभ्यास केला पाहिजे.
विशेषतः -खेड्याकडे चला म्हणणारे, सिलिंग चे समर्थक, तोकड्या जमिनी भूमिहीनांच्या गळ्यात बांधून त्यांना भूदास बनवणारे, पुनर्वाटप करा म्हणणारे- या सर्वांनी बाबासाहेबांच्या या लेखाचे पुनःपुन्हा वाचन करावे.
ग्रामीण अर्थकारणातील प्रश्नांची बाबासाहेबांची ही मांडणी स्वीकारली असती तर देश समृद्ध झाला असता.
ही मांडणी स्वीकारणे गेल्या साठ वर्षात काँग्रेसी आणि समाजवादी, डाव्या, पुरोगामी म्हणवणाऱ्या सरकारांना अडचणीची ठरली असती. म्हणूनच त्यांनी बाबासाहेबांच्या अर्थशास्त्रातील मांडणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले,त्यांच्या सोयीच्या प्रतिमेचा फक्त घटनेचे शिल्पकार म्हणून उदो उदो केला.
त्याचा परिणाम आजचे आपल्या देशाचे मागासलेपण आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या यात दिसतो.
No comments:
Post a Comment