Wednesday 11 May 2016

शेतीआणि शेतकऱ्यांचे प्रश्न आर्थिक आहेत. तेआर्थिक राजकीय पद्धतीनेच सुटतील.

शेतकऱ्यांची चळवळ जातीयवादी झाली नाही, ती कामगार चळवळीसारखी एक समूहावादी युनियनही झाली नाही. म्हणूनच तिचे आकलन समूहाच्या जोरावर प्रश्न सोडवू पाहणाऱ्या आजच्या डाव्या आणि पुरोगामी चळवळीला झाले नाही. ती जातीवादी व्हावी, व्यवस्थाविरोधी व्हावी असे प्रयत्न मोठे धुरंधर पक्ष आणि पुढारी यांनी खूप केले. त्यांना यश आले नाही, खूपदा लपून छपुन किंवा उघड अशी जातीवादी, व्यवस्थाविरोधी मांडणी झाली आणि होते आहे. देशभरात कोणी नेता अग्रस्थानी नसतानाही ही चळवळआपले अर्थवादी स्वरूप घेवून पुढे सरकतेआहे. नेते, संघटना मागे फरपटत येतआहेत आणि लटके नेतृत्व देवू पाहताहेत.आजपर्यंत जे झाले नाही ते यापुढेही होणार नाही. शेतीआणि शेतकऱ्यांचे प्रश्न आर्थिक आहेत. तेआर्थिक राजकीय पद्धतीनेच सुटतील.सूट सबसिडी अनुदान आरक्षण अशा भिकवादी कल्याणकारी मलमपट्टीने फारतर कुणी नेता, संघटना मोठा होईल एवढेच. शेतीच्या आणि ग्रामीण अर्थकारणाचा प्रश्न सोडवण्याची योजना स्वभाप च्या जाहीरनाम्यात दिलीआहे

No comments:

Post a Comment