शेतकऱ्यांची घराणेशाही या देशात पुन्हा स्थिरस्थावर होणे आवश्यक आहे" असे मत असणाऱ्यांचे गेली सत्तर वर्षे राज्य आहे. त्यांच्यामुळेच तर आज अनेक कायद्यांच्या जंजाळात शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अडकली आहे.
शेती व्यवसाय खुला व्हावा, स्पर्धेत मोठा व्हावा, शेतीतून अतिरिक्त मनुष्यबळ सामर्थ्य, भांडवल, कौशल्य घेवून बाहेर पडावे आणि उद्योजक बनून व्यवसाय, व्यापार, सेवा अशा क्षेत्रात भर घालत समृद्ध देश उभा करावा असे स्वप्न बघणारे आणि त्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणारे फारच थोडे इथे जन्मले. शरद जोशी हे त्यापैकी एक.
शेतीतून बाहेर पडणे हा बदलाचा एक अपरिहार्य टप्पा आहे. खरे तर याची गरज बाबासाहेबांनी Small holdings in India and their remedies" या १९१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात सांगितली होती.
खेड्याकडे चला म्हणणारे, सिलिंग चे समर्थक, तोकड्या जमिनी भूमिहीनांच्या गळ्यात बांधून त्यांना भूदास बनवणारे, पुनर्वाटप करा म्हणणारे- या सर्वांनी बाबासाहेबांच्या या लेखाचे पुनःपुन्हा वाचन करावे:
https://restructuringagriculturaleconomy.blogspot.in/…/blog…
गांधीवादी+समाजवादी प्रक्रियेत त्याला खूप उशीर झालाय. तसाच तो नैसर्गिक, आणि सहज होण्याऐवजी गेल्या सत्तर वर्षाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या लुटीमुळे बळजबरीचा आणि अत्यंत हलाखीच्या वातावरणात होत आहे हे खरे.
शेतीत कष्ट करून किंवा शेती बाहेर पडून समृद्ध होण्याचा प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही मार्गातले अडथळे दूर होऊन जसजसे मार्ग प्रशस्त होतील तसतसे शेतीचे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न सुटत जातील. त्यासाठी या मार्गात अडथळे आणणाऱ्या सर्व शक्तींशी लढावे लागेल.